देते मी भरोसे

सावलीस माझ्या माझे दिलासे;

आज ते सारे खोटेच वाटे.

शब्दांचे आघात रिचवून झाले;

ओंजळीत माझे वेचले मी जिणे.

उगा मीच माझा आधार होतो;

मोजायचे किती मी माझे उसासे.

तुझे भास सारे इथे थांबलेले;

जगणे माझे भोवती साचलेले.

किती प्रश्न पाहती वाट तुझ्या उत्तराची;

किती मी करावे तुझ्या वागण्याचे खुलासे.

तुझ्या गावी येणारी बंद वाट माझी;

तरी पावलास माझ्या देते मी भरोसे.