गोष्ट पोटात ठेवणे शिकवून गेले

दुष्ट कंड्याच ते कसे पिकवून गेले

गोष्ट पोटात ठेवणे शिकवून गेले

नेहमी मान खालतीच असेच माझी
शिष्ठ तोराच चोरटे गिरवून गेले
का असा हा वसाच बाणवती कसाई
लाडक्यांनाच नेमके चिथवून गेले
पेलतो जाच बंधने भलती अता ही
मात्र त्यांचेच पाय ते थिरकून गेले

मोडला मी कणा तरी सलते असूया
हात पाठीवरी कसा फिरवून गेले?