पाउस

...

जडं घेउनी मनं ते
नभ उतरला खाली,
ओलिचिंब कथा त्याची
माझ्या मनानी ऐकली.

नभ बरसता असा
पक्षी पानाआड जाई,
त्याचं भिजलेलं गाणं
माझ्या ओठावर येई.

ओल्या होती साऱ्या वाटा,
येता पावसाची सर,
वाटेवर त्या चालतां
रंग चित्रांचे धूसर.

पाउस असा हा,
झाला नाही दिवसांत,
म्हणे मन त्याला
जेव्हा पाही आरशात.

माझ्या मनात हा असा
रोज भेटतो पाउस,
गुज करता तयाशी
रोज लपतो पाउस.

... मधुरा