सागर पोहत बाहू बळाने ।। नाव तयास ... मिळो न मिळो रे ॥ १ ॥
स्वयेच जो तेजोनिधी तरणी ॥ तदगृही दीप ... जळो न जळो रे ।। २ ॥
जो करी कर्म अहेतू निरंतर ॥ वेद तयास ... कळो न कळो रे ॥ ३ ॥
ओळख पटली ज्यास स्वतःची ॥ देव तयास ... मिळो न मिळो रे ॥ ४ ॥
--- कवी बोबडे
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.