एक स्वप्न ते हरवलेले...
तुझी वाट बघत बसायचे,
तुला ताटकळत ठेवायचे,
एक स्वप्न ते हरवलेले...
तुझा हसरा चेहरा डॉळ्यांत साठवायचे,
तुझे अश्रु अलगद टीपायचे,
एक स्वप्न ते हरवलेले...
तुझ्यावर रागवायचे,
तुझा रुसवा काढायचे,
एक स्वप्न ते हरवलेले...
तुझ्याबरोबर चांदण्या रात्री फिरायचे,
तुझ्यासंगे आयुष्य काढायचे,
पण, अखेर स्वप्न ते स्वप्नंच,
एक स्वप्न ते हरवलेले...
तुझेच स्वप्न बघायचे.