सांगणे तसे जरुर आहे

सांगणे तसे जरुर आहे,
ति जवळ असुनही दूर आहे,
इथे हॄदयी माझ्या काहूर आहे..
पण तिचा वेगळाच नूर आहे..

आताशा प्रश्न पडतो,
हीच का ति, जिच्यावर जिवापाड प्रेम केलं,
हीच का ति, जिच्यासाठी घरदार सोडलं,
कळत नही तिच्या मनात काय आहे..
नयनी माझ्या असवांचा पूर आहे..

मि जाणतो आयुष्यं क्षणभंगुर असते.
कधितरी माझी कमी तिला जाणवेल,
ति परतुन येईलही कदाचित....
तिने परतावे ही एकच आस आहे,
सांगणे तसे जरुर आहे.