खुप मार खाल्ला
कैदही सहन केली
अत्त्याचाराची परिसीमा झाली
भावाने तिला घरी नेले
कायद्याचे सहाय्य
आईचा आधार नाही
भावाची बायको खवट
काय करायचे?
जीव द्यायचा मग
सासरी मेले काय अन
इथे काय?
सदगुरू मार्ग दाखवा
दावे मागे घेतले तरच
समझोता
हे कोण करणार?
पोरीला मरायला कोण पाठवणार?
समाजसेवक सारे गुल झाले
आपले कोणीच नाही
ज्याला त्याला संसार प्यारा
चांगला की वाईट?
मग आपणही जावे परत
दावे बांधावे गळ्यात
ओढावे रहाट
भोगावे नशिबाचे
रिकामे गाडगे