पुस्तक - रिमेंबर मी व्हेन आय ऍम गॉन

लेख सुरू करण्यापूर्वी - या लेखामध्ये जेथे भाषांतर मारक ठरले असते तेथे ईंग्रजी वाक्य तशीच ठेवली आहेत.

रेडिओ आणि टेलिव्हिजन या माध्यमांमधून लॅरी किंग हे प्रसिद्ध झालेले आहेत. या मुलाखतकाराने नामवंत, गुणवंत, सौंदर्यसंपन्न, श्रीमंत, बुद्धीमान अशा ३०० कलाकारांना, खेळाडूंना, बिझनेसमधील व्यक्तींना १ प्रश्न केला तो हा की - "त्यांच्या पश्चात, लोकांनी त्यांच्याबद्दल काय बोलावं, आठवावं असं या लोकांना वाटतं? " या प्रश्नाला या ३०० लोकांनी जी उत्तरे दिली त्यातून " रिमेंबर मी व्हेन आय ऍम गॉन" हे पुस्तक जन्मास आलं. यातील उतारे अनेकविध प्रकारची आहेत- काही निखळ विनोदी तर काही अंतर्मुख करणारी तर काही त्या त्या व्यक्तीच्या बुद्धीमत्तेचा आदर वाढवणारी आहेत.पुस्तकात एकूण व्यक्तीमत्वांचे वयवसायानुसार ९ भाग आहेत - चित्रपट तारे/तारका, खेळाडू, लेखक, व्यंगचित्रकार, विनोदसम्राट, बिझनेसमधील लोक, पत्रकार, संगीतकार आणि स्टेजवरील  कलाकार.

१ नक्की की अनेकांना या प्रश्नाने आयुष्याकडे गंभीरतेने पाहण्यास भाग पाडले आहे.

आता सुरुवात करू यात की त्या त्या व्यक्तीला तिच्या थडग्यावर काय लिहीलेले आवडेल याची -

भाग १ चित्रपट तारे तारका-

(१) जोआन बार्न्स - शेवटी एकदाची पार्कींगची जागा मिळाली बाई!

(२) शेली बर्मन -वर्षानुवर्षे मी हे पटविण्याचा व्यर्थ प्रयत्न केला की मी देखील तुमच्यासारखीच एक सामान्य व्यक्ती आहे. आशा करते आतातरी तुम्हाला ते पटेल.

(३) फ्लोरेन्स हेंडरसन- जीवनाचा प्रारंभ श्रद्धा, आशा आणि प्रेम या मूल्यांनी झाला. जीवनाच्या अंतीम काळी श्रद्धा, आशा, प्रेम ही मूल्ये होती. मधल्या काळात मी संशयाच्या भोवऱ्यात गटांगळ्या खात होते.

(४) शर्ली नाईट - या जन्मी मला ही गोष्ट कळली की हिंसा हे कोणत्याही समस्येचे समर्थक उत्तर होऊ शकत नाही हे मला कळले याबद्दल मी उपकृत आहे परंतु या गोष्टीचे वाईट वाटते की बऱ्याच लोकांना ही गोष्ट कळण्यासाठी १ जन्मदेखील पुरत नाही. 

(५) जॅनेट लेह - ईश्वरी तत्त्व आपल्या वागणूकीमधून प्रकट करण्याकरता आयुष्य ही एक संधी तुम्हाला दिलेली असते. मी ते दर वेळेस प्रकट करू शकलोच असे मी म्हणू शकत नाही पण ईश्वर जाणतो की मी प्रयत्न केला.

(६) जॉर्ज चॅकीरीस - क्षण कितीही काळा असो, प्रेम आणि आशा यांना सदैव संधी असते.

(७) स्टेसी कीच -  

हीअर लाइज स्टेसी कीच

अ जॉर्जीआ पीच

लिव्हड ऍट द बीच

नाऊ आउट ऑफ रीच

भाग २ खेळाडू -

(८) बॉब कुसी - जेव्हा कोणाचम लक्ष नव्हतं तेव्हा त्याने त्याचे सर्वोत्तम देणे देऊ केले

(९) डोमिनो डिमॅजीओ - अ गाय हू थ्राइव्हड ऑन चॅलेंजेस लार्ज अँड स्मॉल

(१०) बॉबी नाईट-

व्हेन माय टाइम ऑन अर्थ इज डन

अँड आय हॅव ब्रीथड माय लास्ट

आय वाँट दे बरी मी अपसाईड डाऊन

सो माय क्रिटीक्स कॅन किस माय ऍस.

(११) जेरी कूसमॅन - पहीला आणि शेवटचा गडी बाद करणं सोपं होतं. मधल्या सर्वांनी माझे केस करडे केले.

(१२) टॉमी लासोर्डा - डॉगर स्टेडीअम वॉज हिज ऍड्रेस बट एव्हरी बॉलपार्क वॉज हिज होम

भाग ३ लेखक-

(१३) जॅक कॅनफील्ड - त्याची प्रत्येक कथा ही दुखऱ्या जगावर केलेली मलमपट्टी होती.

(१४) फॅनी फ्लॅग - म्हणजे? पुस्तकांचा दौरा संपला म्हणायचा की काय?

(१५) क्लाईव्ह कसलर -

इट वॉज अ ग्रेट पार्टी व्हाइल इट लास्टेड

आय ट्रस्ट इट इट विल कंटीन्यू एल्स्व्हेअर

(१६) अँड्र्यू ग्रीले -

मे इट बी सेड

व्हेन आय ऍम डेड

हिज सिन्स वेअर स्कार्लेट

हिज बूक्स वेअर रेड

(१७) इव्हान हंटर - तो एखाद्या देवदूतासारखा लिहीत असे