रात्रीत चांदण्यांचा विरघळता पिसारा,
तृप्तल्या गात्रांत गेला तृप्तसा इशारा
मन भोगते पुन्हा तो आवेग मंथनाचा.
अन सांडतो भरुनी शृंगार अंतरीचा.
वनवास या सुखाचा मी विरहात साहीला,
स्वप्नात शोधिला पण शारीर राहिला,
माझ्या प्रियेस ठावा आक्रोश या मनीचा,
दवबिंदुनी विझावा वणवा कसा तनीचा.
होता आवेश वेडा, अन वेडीच रात्र होती,
लवलवती पेटून काया, गंधीत मात्र होती,
नग्न वासनेचा तो, शुद्ध मंत्रखेळ होता,
हृदयातल्या प्रीतीचा त्या अजोड मेळ होता.
होतीस तुच साक्षी रक्तातल्या खुणेची,
गेली जिरून जेव्हा तगमग या मनीची,
आली प्रचंड भरती मग उधाण सागराला,
गेला भिजून अवघा तृषार्त तो किनारा.