या बाबतीत विरोध का नाही ?

रॉकेल, पेट्रोल, गॅस यांचे भाव वाढणार असले की सामान्य जनता तीव्र विरोधाला सुरुवात करते. वस्तुतः, या इंधनांच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असल्याने त्यांचे भाव वाढतच राहतात. दिवसेंदिवस खाणींमधले साठे संपुष्टात येत असताना भाव वाढणे अपरिहार्य आहे.
दैनंदिन जीवनातही विविध ठिकाणी अतिरिक्त पैसे घेतले जातात. तेथे जनतेचा विरोध दिसत नाही.

उदा. मध्यम हॉटेलमधला चहा पंधरा वर्षांपूर्वी तीन रुपयांच्या आसपास होता. तो आता दहा रुपयांवर गेला आहे. हा भाव न परव़डण्यासारखा आहे.
नेहमी त्या हॉटेलमध्ये जाणाऱ्या लोकांनी आंदोलन करुन भाव मर्यादेत ठेवले आहेत, असे उदाहरण नाही. इंधन भाववाढीचे वृत्त प्रसिध्द होते, तेव्हा विरोध सुरु होतो. "मध्यम हॉटेल्समधला  चहा महाग झाला" असे वृत्त प्रसिध्द झाल्याशिवाय त्या विषयाला महत्त्वच येणार नाही की काय, असे वाटते.
चहा हे केवळ एक उदाहरण आहे.
दुसरे खूप पूर्वीचे उदाहरण म्हणजे टेलिफोन बूथचे. मोबाईल फोन येण्यापूर्वी जे बूथ होते, तेथील चालक (काही सन्माननीय अपवाद वगळता) दीड रुपयाऐवजी दोन रुपये घेत असत
रॉकेल, पेट्रोल, गॅस यांच्याबाबत जो  विरोध दिसतो तो दैनंदिन जीवनातील लहान लुटींविरुध्द का दिसत नाही ?