आपल्या देशातली लोकसंख्या

आपल्या देशातली लोकसंख्या काहीच वर्षात चायनाच्या पेक्षा जास्त होणार. आपल्या देशात एवढी लोकसंख्या का ह्या वर कोणी प्रकाश टाकू शकेल का.

१. फॅमिली प्लॅनिंग उशीरा सुरु करणे किंवा नसणे - हे कारण वाढत्या लोकसंख्येला देता येणार नाही. कारण अमेरीकेत सुद्धा ३० मुले होती पुर्वीच्या काळी एका कुटुंबात अशा नोंदी आहेत.

२. आपला देश मागासलेला असला कारणाने प्राथमिक वैद्यकीय उपचार न मिळाल्या मुळे होणारे मृत्युचे प्रमाण जास्त असुन देखील लोकसंख्या वाढत आहे.

३. मोठ्या लोकसंख्येचे कारण हे आहे का - आपला भुतल जवळ जवळ नेहमीच पाण्या वरती राहीला व बाकीचे भूतल पृथ्वीच्या हजारोवर्षांच्या उलाढाली मुळे कधी पाण्यावर तर कधी पाण्या खाली राहीले असल्या मुळे तिथली लोकं व संस्कृती पुसली जायची,  व आपली आबाधीत राहीली व वाढत जाऊन एका वेळेला ती 'क्रिटीकल मास' सारखी एवढी झाली व लोकसंख्येची वाढ सुरु झाली. कुमारी कंदन (१०००० वर्षा पुर्वीचे तामीळनाडु) संबंधी गुगल शोध करुन कल्पना येईल मला काय म्हणायचे आहे त्याचे. ह्या संकेत स्थळावर जाऊन बघा त्या साठी दुवा क्र. १

तुमचे विचार व चर्चे साठी धागा दिला आहे.