२५ वर्षांपुर्वी जे एकाच तुकडीत होते, ते मित्र-मैत्रिणी पुन्हा भेटण्यासाठी एकत्र आले. त्या मित्रांच्या स्नेहसंमेलनानिमित्त लिहीलेली कविता....
बेभान सारे बंध तोडून
चौखूर होई उधळखोर
तरी सोडी खुणा मागे
मन माझे तुफानखोर
धावलो मी भटकलो मी,
आता थांबतो घटकाभर
शोधतो त्या जुन्या खुणा
अन मैत्रीचा ओलापाझर
आज नाचु देईल मनाला
गाफील करुन मित्रांखातर
हळूच जोडेन बंध पुन्हा
फेकुन देऊन हे वेषांतर
दशदिशांवर अंकुश असे जरी
मन भवसागरातील डोलकर
थकशील वा होशील कष्टी
सोबती असेल माझाच मैतर
या रे माझ्या मित्रांनो करा
या स्नेहनात्याचा जागर
क्षण आजचा प्रत्येक देईल
चिरकालिक आनंद अपार