सौम्य चंद्रवदना माझी आई

दुवा क्र. १,r:0,s:0,r:0,s:0

देवी प्रेसचे "सॉफ्ट मून शायनिंग" हे पुस्तक वाचायचे राहून गेले या यादीतील एक पुस्तक! तीन-चार वर्षांपूर्वी या पुस्तकातील काही कवितांचे अप्रतिम नमुने जालावर वाचावयास मिळाले त्याबद्दल थोडेसे.
भावपूर्ण आणि खरं पाहता अत्यंत झपाटून टाकलेपण हे या कवितांचे मला जाणवलेले वैशिष्ट्य. आत्मिक सौंदर्याने परिपूर्ण असलेल्या या कवितांचा उगम हा, देवीला, आई समजून तिच्यावरच्या तीव्र आणि प्रखर प्रेमामधून झालेला आढळून येतो. या कविता एकापेक्षा एक सरस असून, वाचकास वेगळ्याच मंतरलेल्या विश्वात घेऊन जातात. जशी आईला भेटण्याची, बिलगण्याची बाळाला विलक्षण ओढ असते त्याप्रमाणे देवीला भेटण्याची कवीची ओढ प्रत्येक कवितेमध्ये जाणवते.
अतिशय वेगळ्याच अध्यात्मिक उंचीवरून या कविता लिहीलेल्या आहेत हे लगेच कळून येते. कवितांचे नमुने पुढील दुव्यावर आढळतील - दुवा क्र. २