आठवण

आठवत ते,
तीच नेहमी मला शोधणं
मी दिसल्यावर गालां वर खळी पाडून हसणं..
तिच डोळेभरून पाहताना हळूच नजर चोरणं.
बोलता बोलता नजरेने वेगळच काही सांगणं,
आठवत ते,
तिच समोर नसूनही सर्वत्र असणं...
आठवतो तो दिवस,
जेव्हा तिला पहिल्यांदा पहिलं
तिच्या नजरेतलं आर्जव मनात घर करून राहिलं.
रोज रोज तिला पाहण्यासाठी मन आतूर झालं
दिसताचक्षणी  तीच रूप हृदयात जपून ठेवलं.
आठवतो तो दिवस,
जेव्हा तिला अखेरच पहिलं...
आठवते ती रात्र,,
जेव्हा ती   बातमी आली होती.
एवद्याशा आजाराने ती अंथरुणातच गेली होती..
वाटलं होत जाब विचारावा त्या मंदिरातल्या दगडाला.
पण त्यादिवशी त्यानेसुद्धा समईची वात अर्धी केली होती.
आठवतो तो दिवस, आठवते ती रात्र...