नमस्ते, सचिन...

कुणी नंबर देता का नंबर
लैंडलाइन किंवा मोबाइल...
कुणाचा म्हणून काय विचारता ?
अहो, आपल्या लाडक्या तेंडल्याचा !...
नंबर नाही मिळाला तर
काय करीन म्हणता ?
कुतुबमीनार किंवा लाल किल्ल्यावर चढून जाईन...
एव्हरेस्टचे उंच शिखर गाठीन...
अथवा
'ताजमहाल'च्या भव्य प्रांगणात उभा राहीन...
मनापासून करायचाय अभिनंदनाचा वर्षाव
सचिन रमेश तेंडुलकरवर !...
वीस वर्षापासून आपल्या बहारदार खेळाने
अवघ्या क्रिकेट रसिकांना
भरभरून स्वर्गीय आनंद मिळवून दिल्याबद्दल...
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमी तीस हजार रन्स काढल्याबद्दल...
वनडेत नाबाद दोनशे रन्सची सर्वोच्च खेळी केल्याबद्दल...
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पन्नास शतकांचा माइलस्टोन गाठल्याबद्दल...
नंबर नाही मिळाला तर
या अथांग सागराच्या पृष्टभागावर...
सर्वदूर पसरलेल्या हिरव्यागार चादरीवर...
अथवा
आकाशाच्या भव्य पटलावर...
आपल्या रक्ताच्या शाईने लिहिणार आहे -
कौतुकाचे चार शब्द... सचिनबद्दल...
प्लीज, द्या हो नंबर मला तेंडल्याचा
लैंडलाइन, मोबाइल...
ई-मेल आयडी सुद्धा चालेल...!...

- सुभाष गंगाधर अक्कावार, नाशिक