चीज पराठा

  • घरात जे असेल ते (अमुल, न्युट्रीला, ब्रीटानिया) चीज दोन क्युब्ज्स.
  • तिखट चवीनुसार
  • मीठ चवीनुसार
  • गरम मसाला १ छोटा चमचा
  • हळद, हिंग प्रत्येकी चिमुटभर
  • कोथिंबीर बारीक चिरलेली
  • भिजवलेली कणीक
५ मिनिटे
कितीही खा, तयार आणि गरमा गरम मिळाल्यावर हाणायला काय जातय आपल?

अस सगळ साहित्य गोळा करून मग पराठ्याची तयारी झाली की गॅसवर तवा ठेवून पुढील कृती करा.

दुवा क्र. १ a="">दुवा क्र. २दुवा क्र. ३

प्रथम चीज किसून घ्या (फ्रीजमधले चांगले टणक असते पटकन किसले जाते)

दुवा क्र. ४ a="">दुवा क्र. ५दुवा क्र. ६

त्यात चवीनुसार तिखट, मीठ, गरम मसाला, चिमुटभर हळद आणि हिंग घाला
बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हलक्या हाताने मिश्रण कालवा.

दुवा क्र. ७ a="">दुवा क्र. ८दुवा क्र. ९

कणकेच्या गोळ्यामध्ये हे सारण भरा

दुवा क्र. १० a="">दुवा क्र. ११दुवा क्र. १२

हलक्या हाताने पराठा हव्यात्या आकारात लाटा (मला गोलच लाटता येतो घाईच्या वेळी)

दुवा क्र. १३ a="">दुवा क्र. १४दुवा क्र. १५

तेलाचे बोट लावून खरपुस भाजा.

दुवा क्र. १६ a="">दुवा क्र. १७दुवा क्र. १८

तयार पराठा सॉस किंवा चटणी बरोबर सर्व करा.

दुवा क्र. १९ a="">दुवा क्र. २०दुवा क्र. २१

अश्याप्रकारेही सर्व करू शकता

दुवा क्र. २२ a="">दुवा क्र. २३दुवा क्र. २४

कॅलरीजची चिंता असणाऱ्यांनी कृपया आपापल्या जबाबदारीवर हा पदार्थ खावा.

स्वतःचे शोध, इतरही प्रकार उपलब्ध असतील मला कल्पना नाही.