कुठूनशी एक पावसाची सर येते,
आणि संथ पाण्यासारख्या आयुष्यात हालचाल माजवते.
थेंबांच्या वलायांबरोबर आठवणी सुद्धा दूरवर पसरू लागतात.
चलचित्रा प्रमाणे आयुष्याचा प्रवास उलगडू लागतात.
तीच ती तुटकी फुटकी झोपडी,
जमीन गेली म्हणून झालेली बापाची हतबलता
दोन घासांसाठी मायच्या जीवाची होणारी घालमेल,
अंगाच मुटकुळ करून पडलेल्या आजाची दुर्बलता.
सगळ काही क्षणात डोळ्यासमोरून सरकत.
आणि आजही नजरेवर अश्रूंच्या सावल्या पसरू लागतात..
शालेय शिक्षणाची तशी गोडी कधी वाटलीच नाही,
पण काळाने जे काही शिकवलं ते मनात कायमच कोरल गेलं
पुढे खूप प्रगती केली, खूप पैसा कमावला,
पण हे छापलेल्या कागदांचे तुकडे कमावता कमावता,
आपली माणस मात्र गमावत गेलो.
आता या आयुष्याच्या संध्याकाळी बरचं काही आठवत,
बरचं काही केलं, बरचं काही करायाच राहून गेलं..
थोडं स्वतशीच बोलल्यावर मन मोकळ होत..
अजूनही एक आशा आहे जगण्याची , पुन्हा भरारी घेण्याची,
अजूनही एक भीती आहे,
माणसांप्रमाणे, स्वताची सावली सुद्धा साथ सोडून जाण्याची.
---म. अ. पा.