झटपट मूग चाट

  • १ वाटी मोड आलेले मुग
  • १ मध्यम आकाराचा कांदा
  • १ मध्यम आकाराचा टोमॅटो
  • ५/ ६ काड्या कोथिंबिर निवडुन दुहून घेतलेली
  • मीठ
  • तिखट
  • १/४ चमचा जिरे
  • १ चमचा चाट मसाला
५ मिनिटे
३ / ४ जण

कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावे. १ वाटी मोड आलेले मूग घ्यावे त्यात १ वाटी पाणी घालून ते ५ मिनिटे गॅस वर ठेवावे, (गॅस मध्यम आचेवर सुरू ठेवावा. ) म्हणजेच मूग थोडेसे उकडून घ्यावे. नंतर मुगा मधलं पाणी कडून टाकावं, आणि हे मूग तव्यावर १ चमचा लोणी घालून ३ /४ मिनिटे परतून घ्यावा. या नंतर मूग एक वाडग्या मध्ये कडून घ्यावे, त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तिखट, जिरे पूड आणि चाट मसाला घालावा. हे सगळं सारण छान हालवून घ्यावे.

१ सर्व वयोगटातील व्यक्तींना आवडण्यासारखे.

२. अतिशय पौष्टिक.