पावटे भात

  • १ वाटी तांदुळ
  • एक / दिड वाटी पावटयाचे दाणे
  • ४/५ मिरच्या
  • ४ /५ लसुणाच्या पाकळ्या.
  • ६ /७ काड्या कोथींबिर - निवडून दुहून चिरून घेतलेली.
  • २ चमचे बिरयाणी मसाला.
  • २ चमचे तेल
  • फोडणीचे साहित्य.
  • १/२ लिंबू
  • २ चमचा सजुक तुप
२० मिनिटे
४ /५ जण

तांदूळ स्वच्छ दुहून घ्यावे.

मिरच्या आणि लसूण ठेचून  घ्यावे.

एका छोट्या कुकर मध्ये फोडणीसाठी २ चमचे तेल, १ चमचा मोहरी, १ चमचा हळद घालावी, मोहरी तडतडल्यानंतर त्यात  लसूण  आणि मिरच्याचा ठेचा घालावा, फोडणी खमंग सुवास आल्यावर मग त्यात  २ चमचे बिर्याणी मसाला,  तांदूळ, पावटयाचे दाणे ,  कोथिंबीर, १ चमचा लिंबाचा रस, व चवीनुसार मीठ घालावे.

कुकरच्या दोन शिट्या झाल्यावर २/३ मिनिटे गॅस बारीक करून ठेवावा.

कुकर सोडल्यावर लगेच भातामध्ये २ चमचे तूप सोडावं.

करून पाहा.

नणंद - आशाताई.