दोडका-बटाटा ( चविष्ट - दोडका न आवडणाऱ्यांचे मन वळवण्याचा प्रामाणिक प्रयत्न )

  • पाव किलो दोडका
  • ३ / ४ बटाटे
  • मीठ
  • तिखट
  • फोडणीचे सहित्य
१५ मिनिटे
३ / ५ जण

दोडके धुऊन घ्यावे, आणि त्याची साले कडूनं घ्यावी.

बटाट्याची पण साले कडून घ्यावी, बटाटे धुऊन घ्यावे.

नंतर  दोडक्याचे आणि बटाट्याचे काप करून घ्यावे, आणि ते दोन्ही एकत्र कुटून घ्यावे. शक्यतो खलबत्त्यामध्ये कुटावे, मिक्सर मधून काढले तर जास्त पाणी सुटते.

आता कढई मध्ये २ / ३ चमचे तेल घेऊन त्यात १ चमचा मोहरी, २ चिमूट हिंग, १ चमचा हळद, चवीनुसार  तिखट घालून खमंग फोडणी करून घ्या. मग त्यामध्ये वाटलेले सारण घालून १० मिनिटे भाजी शिजू द्यावी. भाजी शिजत आली की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालावं.

बऱ्याचा जणांना ज्यांना दोडका आवडत नाही त्यांनाही अशी भाजी नक्की आवडेल.

टाकाऊ पासून टिकाऊ (क्षमःस्व टाकाऊ पासून चविष्ट ) --

दोडक्याचा साली पासून दोन प्रकारच्या चटण्या करता येतात.

आई