झटपट लोणचे - मटार, फ्लॉवर, गाजर

  • १ वाटी सोललेले मटार
  • २ गाजरे मध्यम आकारची
  • १ वाटी फ्लॉवर बारीक चिरलेला.
  • २ चमचे मीठ
  • १ लिंबू
  • ३ चमचे केप्र कैरी लोणचे मसाला.
  • २ चमचे तेल
  • फोडणीचे साहित्य
१५ मिनिटे
५ /६ जण

१ वाटी फ्लॉवर बारीक चिरून घ्यावा, त्यात १/२ चमचा मीठ व एक वाटी पाणी घालून ३/४ मिनिटे गॅस वर ठेवून किंचित वाफवून घ्यावा. म्हणजे फ्लॉवर चा उग्रपणा कमी होतो, शिवाय त्यातील सुक्षः जंतू पण मारले जातात.

गाजराचे साल कडून ते सोलून घ्यावे आणि बारीक चिरावे.

मग एका वाडग्यामध्ये चिरलेले गाजर, फ्लॉवर, मटार, २ चमचे मीठ, ३ चमचे कैरी लोणचं मसाला व लिंबाचा रस घालून सारण छान हालवून ३० मिनिटे मुरण्यासाठी ठेवावे.

नंतर फोडणी करून घ्यावी, त्यासाठी कढल्यामध्ये २ चमचे तेल घालून, २ चमचे मोहरी घालावी, मोहरी छान तडतडल्यावर त्यात, योग्य प्रमाणात हळद, हिंग घालावे. फोडणी थंड झाल्यावर सारणात घालावी व परत हे सारण/लोणच १५/ २० मिनिटे मुरण्यासाठी ठेवावं.

छान, स्वादिष्ट, लज्जददार लोणच तुमची वाट आहात आहे.

या दिवसामध्ये मिळणारा मटार आणि गाजर छान कोवळे, चविष्ट असतात, त्यामुळे लोणच खूप छान स्वादिष्ट लागते, हे लोणच झटपट तयार होत म्हणून झटपट लोणच असे नाव देण्यात आले आहे.

कृपया फ्लॉवर उकडून घेऊ नये, तो फक्त थोडासा वाफवून घ्यायचा आहे. खाताना तो कच्चाच लागला पाहिजे.  

आई