मटण कालवण प्रकार १

  • कोवळे मटण १ किलो
  • कांदे ४ बारिक चिरुन
  • टोमेटो २ चिरलेले
  • आलं १ इंच
  • लसुण पेस्ट २ चमचे
  • कोथिंबीर ७ काडया
  • पुदिना मुठभर
  • हिरवी मिरची २
  • चिंच ३ ते ४ बुटुक
  • फोडणी साठी : तमालपत्र २, लवंगा ४, मिरि ८ ते १०, कडीपत्ता १० पाने
  • मिठ चविनुसार
  • हळद १ चमचा
  • १ लिंबाचा रस
  • तिखट ४ चमचे...(आवडिनुसार कमी जास्त)
  • तेल कुकरचा तळ बुडेल इतपत
  • मट्ण मसाला ४ चमचे
  • गरम पाणि ४ ते ५ वाट्या
२ तास

हिरवे  वाटण  :-  मिरची,   कोथिंबिर,   आलं,   लसुण, पुदिना  वाटून  घ्या.                                                     साधारण साहित्य :-

१. सर्वप्रथम मटण स्वच्छ धुऊन पाणी निथळून घ्या. त्यात १/२ टिस्पून मीठ, १/२ चमचा हळद, १/२ चमचा तिखट, १ चमचा मटण मसाला व लिंबूरस लावून १ तास मेरिनेट करा -------------------->


२. एकीकडे पणी गरम करायला ठेवा तर दुसरी कडे कुकर मध्ये तेल गरम करून घ्या यात लवंग, मिरे, तमालपत्र व कडिपत्याची खमंग फोडणी करा. --------------------->


३. यात चिरलेला बारीक कांदा घालून गुलाबी होइसतोपर्यंत परता.  

४. यात टोमेटो घालून ते मऊ होईपर्यंत परता.. मग हळद, १ चमचा तिखट व चिंच घालून परता लगेचच थोडे थोडे मटण घालून परतत राहा. एकदम सगळे घातले तर पाणी सुटेल. मटण चांगले रंग बदले पर्यंत परता. मटण मसाला व ३ चमचे तिखट घालून खाली वर करा. त्यात वाटलेला हिरवे वाटण पण घाला. ------------------->

५. आता गरम पाणी व  मेरिनेट  मटणाला  सुटलेले  पाणी  घाला. चव पाहून मीठ घाला. -------------------->


६. उकळी आली की कुकर बंद करून ६ शिट्या द्या किंवा... प्रेशर आल्या वर आंच कमी करून २० ते २५ मिनिटे शिजवा ------------>

७. प्रेशर गेल्यावर... कुकर उघडून ताटात कोथिंबीर भुरभुरून सर्व्ह करा.

  • मटण मसाला बाजारात सहजरीत्या उपलब्ध आहे. तोच वापरला आहे ह्या रेसिपीत. मसाला चांगला असेल तर चव सुरेख येईल. चांगल्या कंपनीचा मसाला वापरल्यास उत्तम
  • हवे असल्यास आखा खडा मसाला ही फोडणीत वापरू शकता. मसाला मसालेदार नसेल तरच. किंवा गरम मसाला १ चमचा टाकला तरी चालेल.
  • पुदिना मटणाला चांगली चव देतो.

कोणी नाहि... मी स्वतः