कांद्याची रस्सा भाजी

  • कान्दे-५ मोठे
  • लसूण पाकळ्या-४,
  • आल्याचा तुकडा,
  • शेन्गदाण्याचा कूट,
  • फोडणीसाठी तेल,
  • मोहरी
  • हिंग
  • पाणी,
  • हिरवी मिरची,
  • हळद,
  • लाल तिखट,
  • मीठ,
  • कोथिम्बीर,
  • लिम्बू
१५ मिनिटे
४ जण

कांद्याची रस्सा भाजी:

कृतिः
१- सर्वप्रथम कांदे बारीक चिरून घ्या आणि बाजुला ठेवा.
२-जाड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग घाला. नंतर आले +लसूण+हिरवी मिरची पेस्ट करून घाला, मग हळद, लाल तिखट घाला.
३-मसाल्यासारखा सुगंध आला की त्यात दाण्याचा कूट घाला, मीठ घाला, आणि पाणी घालून रस्सा उकळत ठेवा.
४-१ लहान कढई घेउन त्यात तेल घालून फोडणी तयार करा व त्यात कांदे छान गुलाबी रंगावर परतून घ्या.
५-  हे परतलेले कान्दे आता रस्स्यात घाला व बाउल मध्ये सर्व करा. सजावटीसाठी कोथिंबीर घाला.

  •  

    जेवायला वाढतेवेळी लिंबाची फोड वाढावी.

  •  लिंबू पिळून  ही भाजी थालीपीठ किवा रोड्ग्यासोबत खावी.
  • तुम्ही सजावटीसाठी खोबर्याचा कीसही वापरू शकता.
  • भाजी गरम गरम वाढावी 
टिफ़ीन