मक्याचे केनेप्स

  • केनेप्स पाकीट -१
  • मक्याचे दाणे- स्वीट कॉर्न. - २ वाट्या.
  • बटाटे- २ मध्यम
  • चिंचेचा कोळ - थोडासा.
  • कांदा - बारीक चिरून - १ वाटीभर
  • तिखट
  • मीठ
  • शेव
  • कोथिंबीर
१५ मिनिटे
३-४ लोक

ज्यांन्ना माहीत नाही त्यांच्या साठी :-  केनेप्स म्हणजे फ्लोअर आणि काही पदार्थ वापरून केलेले छोटे छोटे चौकोन. हे किराणा मालाच्या दुकानात, बेकरी किंवा स्पेंन्सर सारख्या दुकानात मिळतील.

प्रथम बटाटे मस्त उकडून घ्या. ते रोवळीत काढा. मग साले काढून बारीक तुकडे करून घ्या. तोपर्यंत स्वीट कॉर्न सुधा मस्त उकडून घ्या. १ किंवा २ शिट्ट्या. स्वीट कॉर्न शिजवताना त्यात थोडेसे मीठ घाला.

आता सरळ केनेप्स टेबल वर मांडून त्यात स्वीट कॉर्न चे दाणे त्यावर खूप बारीक चिरलेला कांदा, बटाटा, तिखट, मीठ (बेताने कारण स्वीट कॉर्न मध्ये पण शिजवताना घातलेय.) मग चिंचेचे पाणी आणि कोथिंबीर टाका.

डिश तयार आहे. सर्व्ह करायच्या आधीच सगळे संपवतात.  

नॉन वेज खाणारे वेगळे कॉंबिनेशन बनवू शकतात.

एस. पी. डी. पी.  पण बनवू शकता केनेप्स वपरून.