केळ्याच्या सालीची भाजी.

  • केळीच्या साली- ६ पिकलेली
  • डाळीचे पीठ
  • तिखट
  • मीठ
  • कोथिंबीर
  • फोडणीचे साहीत्य
१५ मिनिटे
३-४ लोक

आपण जेव्हा पिकलेल्या केळ्याची शिकरण करतो किंवा फक्त केळी खातो. तेंव्हा साली फेकून दिल्या जातात. या साली धुवून एका कॅरीबॅग मध्ये ठेवल्या तर फ्रीज मध्ये २ दिवस टिकतात. ताज्याच आणि धुतलेल्या सालींची भाजी तर आणखी उत्तम.

भाजी करताना सालींचे कात्रीने छोटे चौकोनी तुकडे करून घ्या.

एका कढईत थोडेसे तेल घेउन जीरे, मोहरी, हिंग, हळद यांची खमंग फोडणी करा. त्यात केळीच्या सालीचे तुकडे परतून घ्या.

मग तिखट, मीठ, कोथिंबीर टाकून परता. झाकण ठेवून एक दणदणीत वाफ द्या. मग डाळीचे पीठ हळू हळू टाकत परता. ते अंदाजाने टाका. परत झाकण ठेवून वाफ द्या.

केळ्यामुळे थोडीशी गोडसर चव येते. फक्त साली खूप काळ्या पडण्यापूर्वी भाजी करून टाका.

फुलके, ही भाजी आणि लिंबाचे किंवा मिरचीचे लोणचे आणि दही.एखाद्या रात्रीचे हलके मस्त जेवण होते.

माझ्या गावाकडची ही सोपी भाजी आवडली तर नक्की सांगा.कोणतेही वेगळे सामान लागत नाही.घरातल्या सामानातूनच होते.