पांढरा पुलाव

  • आखा (जुना) बासमती तांदुळ २ वाटयांचा उकडुन मोकळा केलेला भात
  • श्रावण घेवडा (फ़रसबी) १ वाटि बारिक चिरुन
  • गाजर १ मोठे बारिक चोकोनि चिरुन
  • १ छोटा फ़्लावर. छोटि फुले चिरुन
  • उकडलेले मटार १ वाटि
  • हिरव्या मिरच्या ४ उभ्या चिरुन
  • लसुण ६ पाकळ्या एकदम बारिक चिरलेला
  • गरम पाणी भाज्या उकडण्यासाठी
  • रिफ़ाईंड तेल आवश्यकते नुसार
  • मिठ चविनुसार
  • साखर १/२ चमचा (ऑप्शनल)
  • पांढरी मिरी पावडर पाव चमचा
  • खायचा सोडा २ चिमटी (ऑप्शनल)
  • आखा(खडा) गरम मसाला : मिरे १० ते १२, १ जावित्रि,
  • २ चक्रिफुल, २ ते ३ दालचिनी, लवंगा ७, काळी बडी वेलची २, हिरवी वेलची ५ ते ६,
  • शहाजिरे १ ते २ चमचे., तमाल पत्र २ .
३० मिनिटे


साधारण साहित्य :------------------------->
 



१) भाज्या उकडून घ्या. गॅस वर पातेल्यात पाणी उकळायला ठेवून त्यात १/२ चमचा मीठ आणि खायचा सोडा २ चिमटी घालून ४ ते ५ मिनिटे भाज्या एक एक करून उकडून घ्या.भाजी उकडून झाली की ति रोळी मध्ये गाळून त्या वर लगेचच गार पाणी घाला म्हणजे भाजीचा रंग  हिरवागार तसाच राहील...तसे नाही केलेत तर भाज्य़ांचा रंग मळकट (डल) होईल. अशाप्रकारे सर्व भाज्या, गाजर उकडून घ्या. बाजूला ठेवा.  ---------------------------->

२) बासमती तांदूळ मोकळा शिजवून घ्या. परातीत पसरून बाजूला ठेवा. --------------------->

 

३) आता वेळ झाली फोडणी ची....पटकन एका कडईत तेल गरम करून त्यात आखा खडा मसाला परता...

    त्यात मिरची चे तुकडे व बारीक चिरलेला लसूण घालून परता. --------------------->
  


४) आता हि फोडणी + उकडलेल्या भाज्या + साखर + मिरी पावडर + चव पाहून मीठ शेवटी घाला. छान मिक्स करून घ्या. --------------------->
  


५) डिश मध्ये काढून पुदिना पाने वरून घालून पेश करा. --------------------->



   <-----------------------------


  • हा पुलाव एकदम बेसिक आहे....मला पर्सनलि असा पांढरा शुभ्र पुलाव आवडतो. हा पुलाव दिसायला मस्त दिसतोच. शिवाय कोणतीही रस्सा भाजी, दाल बरोबर खाता येईल. नुसता सुद्धा छान लागतो.
  • ह्या पुलावात तळलेले पनीर, तळलेले काजू, बेदाणे, टीनं मधील पायनापलचे तुकडे घालून रीच पुलाव बनवू शकता. अजून लज्जत वाढेल.
  • बासमती तांदूळ मोकळा शिजवताना टिपा :  तांदूळ शिजवताना १ कप तांदळाला १ १/२ (दीड) कप पणी असे प्रमाण घेऊन शिजवा. शिजवताना त्या पाण्यात मीठ, तेल किंवा तूप १ चमचा व किंचित लिंबाचा रस घालून शिजवा. इकडे २ वाट्या तांदूळ घेतलाय तर ३ वाट्या पाणी घालायला लागेल. गरम भात लगेचच परतीत काढून काट्याने मोकळा करून पसरून घ्या. म्हणजे भात छान मोकळा होईल...वाटल्यास थोडे तेल घालून मोकळा करा.
  • लिंबाच्या रस घातल्याने भात पांढरा शुभ्र होतो. आणि तेल घातल्याने मोकळा.


 

मनु स्टाइल.. पुलाव