गोपाळ काला

  • पोहे १ वाटी
  • हिरव्या मिर्च्या ४-६
  • दही ४ च.चमचे
  • ज्वारी, साळीच्या लाह्या१/२ वाटी
  • काकडी १ किसून
  • भिजवलेली चण्याची डाळ १/२ वाटी
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • खोबर्याचा किस
  • लिंबाचं लोणचं
  • मीठ
  • द्राक्षे
  • डाळींब दाणे
  • शेंगदाणे
  • साखर चमचाभर
१५ मिनिटे
४-६ जण
  • सर्वप्रथम पोहे, लाह्या पाण्याने ओल्या करून घ्याव्या. भिजवून ठेवू नये.
  • मिरची, कोथिंबीर बारीक चीरून घ्यावी.
  • आता १ पातेले घेऊन त्यात पोहे, लाह्या, काकडीचा कीस, खोबऱ्याचा कीस, द्राक्षे,कोथींबीर, लिंबाचं लोणचं, डाळींब दाणे, शेंगदाणे, भिजवलेली चण्याची डाळ, दही, मीठ, व साखर घाला. आणि १० मिनीट झाकून ठेवा.
  • नंतर सर्व मिश्रण एकत्र करा आणि सर्व्ह करा.
  • पोहे जाड, पातळ कुठलेही चालतील,२-३ प्रकार एकत्र पण चालतात . चव आणखी चांगली येते.
  • आवडत असल्यास मेतकूट ही घालू शकता.
  • विदर्भामध्ये हा पदार्थ गोकुळाष्टमीला करतात.
पारंपारिक