शोधात राजकन्या कसल्या तरी निघाली,
समजून राजकुमार मजला, चल मला म्हणाली.
घेतला हाहात हात, तिने माझा हर्षाने,
ओढीत तीजसंगे, वेगाने निघाली.
थांबलो नाही उगाच, न विचारले तिलाही,
जाऊ जीथेहि ती, घेवून मज निघाली.
लक्ष दिलेच नाही, तिने वागण्यात माझ्या,
तिच्याच धुंदीत ती, वायुवेगे निघाली.
उंची न्हवते वस्त्र, मज अंगास गुंडाळलेले,
तरीही ती बेभान, यौवनी निघाली.
मग थांबली दचकून, सोडून हाथ दिला,
वेगळेच तुम्ही आहात, नाही कळलेच मला.
हाथ रुक्ष तुमचा, भासला हाताला,
क्षमा असावी, क्षमा महाराज मला.
लाजविले तिने, जरी चूक तिचीच असली,
पण ती राजकुमारी नजरेत माझ्या बसली.