स्वप्नातील राजकन्या

ती राजकन्या एक, स्वप्नात आली होती,
बांधून छोटे घरटे, मनात राहिली होती.

एकच दिवस सहवास, लाभला होता मनाला,
क्षणात मला एकटे, करून गेली होती.

फुलात तिचा सुगंध, पानावरी सुवास होता,
चोरून दृष्टीस,मज अंध करून गेली होती.

वेचीत मोती होतो, तिच्याच साठी सारे,
रीतीच फुलदाणी, ती उगाच घेवून गेली.

हुंदका मनात येतो, आठवणीत तिच्या,
स्पर्श मनात माझ्या, कोरून गेली होती.

डोळ्यात चांदणे ते, गालात गुलाबी हास्य,
मोहून मज खुल्याला, ती मोहिनी गेली होती.

संपला क्षणात वेळ, ती वेळच माझी न्हवती,
उडवुनी रेत, ती फेकुनी डोळ्यात गेली होती.