चला लहान होऊया !!

आज जेवायला बसलो असताना अचानक लहानपणीचा विषय निघाला, आणि मग काय सगळे जण आपापल्या आयुष्यातील  लहानपणीच्या गमती-जमती सांगायला लागले... आणि हसूनऱ्हसून पोट दुखायला लागलं... म्हणून विचार केला की मनोगतावर पण हा विषय मांडून पाहू, परत एकदा हसूया, लहान होऊया....

१. माझं शिक्षण मराठी माध्यमातून झालं आहे, त्यांमुळे लहानपणी बरेच इंग्रजी शब्द नीट माहीत नव्हते, पण तरी घरातलं मोठं कोणीतरी असे इंग्रजी शब्द वापरताना पाहिलेलं असायचं त्यांमुळे मी ही ते इंग्रजी शब्द वापरायचे, पण त्या शब्दाचा उच्चार करताना किंवा वापरताना खूप चुका व्हायच्या.......                                                                                                                                उदा. टेमप्लिज. खरं तर याला Time Please  अस म्हणायला हवं हे खूप उशीर समजलं.

२. लहानपणी माझ्या एका मैत्रिणीला फुफ्फुस कधीच म्हणता येत नसे, ती नेहमी त्याला फुसफुस म्हणायची...

३. मला Bonavita कधी म्हणता येत नसे, मी नेहमी त्याला गोलमिटा म्हणायचे.

४. मी आणि माझ्या ताईच्या वया मध्ये ३ वर्षाच अंतर आहे, तर माझा जन्म झाला तेव्हा आजी ताईला घेऊन दवाखान्यात आली, ताई आईला भेटली, नंतर तिने मला पाहिलं आणि ती मग आईला म्हणते कशी - आई तू आपली पटकत घरी ये, बाळ छान आहे, पण बाळाला काही आणू नकोस बरोबर, बाळाला इथेच राहू दे.

किती लिहू आणि किती नाही अस झालं आहे. तरी इथे थांबते मी, उगाच तुमच्या मनात माझी इमेज खराब होईल, आणि तुम्ही विचार करायला लागाल काय बावळट होती हि लहानपणी...

असो पण मला आवडलं हे सगळं लिहिताना...