३८. (दोन) ग्रह, तारे आणि आपण!

आध्यात्मानं कार्यकारणाचा वेध वैश्विक स्तरावर घेण्याचा प्रयत्न केला आहे. हा अत्यंत वेगळा आयाम आहे. विज्ञान तर्कनिष्ठ आहे तर अध्यात्म संवेदनाशिल आहे हा या दोन दृष्टीकोनातला मूळ फरक आहे.

अध्यात्म तर्कशून्य किंवा विज्ञान विरोधी नाही, ते सर्वंकश आहे, तर्काला किंवा बुद्धीला न्याय देऊन ते संवेदनेनं कार्यकारणाची दखल घेतं.

संवेदनाशिलतेतून जेव्हा कार्यकारण भावाकडे बघितलं जातं तेव्हा अनेक पैलूंचा उलगडा होत जातो.

सर्व प्रथम, आपलं अस्तित्व फक्त एका गोष्टीवर अवलंबून आहे आणि ती म्हणजे आता, या क्षणी आपला चालू असलेला श्वास! हा श्वास थांबला तर एका क्षणात सगळं व्यर्थ होईल, कोणत्याही तर्काला काहीही अर्थ राहणार नाही.

श्वास चालू राहीलच या गृहीताला कोणताही आधार नाही!

आता श्वासा सारखी संपूर्ण दुर्लक्षित गोष्ट किती गुतांगुंतीच्या घटनांवर अवलंबून आहे ते बघण्या सारखं आहे. सूर्य अठरा कोटी किलोमिटर वर प्रकाशमान आहे म्हणून पृथ्वीवर जीवसृष्टी आहे. पृथ्वी स्वतः भोवती फिरते आहे म्हणून तिचा सूर्या समोरचा भाग जळून खाक होत नाही. पृथ्वी आणि सूर्यातलं अंतर हे अनाकलनिय कारणां मुळे कायम आहे, ह्यात जरा सुद्धा फरक पडला तर पृथ्वी एकतर सूर्याकडे ओढली जाईल किंवा त्याच्या गुरुत्वाकर्षण कक्षे बाहेर जाईल आणि एका क्षणात सगळं संपून जाईल. पृथ्वीची सूर्या भोवती प्रदक्षिणा म्हणजे अठरा कोटी किलोमिटर त्रिज्ज्येचं एक वर्तुळ आहे. या वर्तुळातून फिरतांना कोणताही ग्रह मध्ये आला तर पृथ्वीचे तुकडे होऊ शकतील.

आता पृथ्वी वर झाडं आहेत म्हणून माणूस जीवंत आहे आणि माणूस आहे म्हणून झाडं जीवंत आहेत. झाडं जीवंत आहेत कारण समुद्र आहेत आणि त्यांच्या पाण्याची वाफ होऊन पाऊस पडतोयं. समुद्र आणि चंद्र यांच्यात एक अनाकलनिय नातं आहे म्हणून समुद्र जागेवर आहेत. यात पुन्हा पृथ्वी आसाला थोडी कललेली आहे म्हणून ऋतू आहेत. आता हे सर्व एका वेळी, या क्षणी चालूयं म्हणून आता, इथे, तुमचा आणि माझा श्वास चाललायं! यातला एक घटक जरी बिघडला तरी सगळं संपू शकेल!

पुन्हा हा सर्व पसारा ज्यात मांडला गेलाय तो निराकार इतका अथांग आहे की त्याला दिशाच नाही! तरी ही सर्व ग्रह आणि तारे ठराविक अंतरा वरून ठराविक वेळेत ठराविक दिशेनी, वेगवेगळ्या ग्रहां भोवती फिरतायेत. आणि सगळ्यात कहर म्हणजे हे आपोआप चाललंय! सर्व अस्तित्व स्वयंभू, मुक्त आणि तरी ही अत्यंत स्वनियंत्रित, लयबद्ध आणि कमालीचं रहस्यमय आहे.

मोठ्यातला मोठा सूर्य देखील निराकरात प्रकट झाल्यानी तो निराकारचंच रूप आहे, म्हणजे त्याच्या आत कुणीही नाही. शून्यातून आकाराचं प्रकटी करण आणि पुन्हा आकारचं शून्यात विलिनीकरण आणि तरी ही शून्य पुन्हा होतं तसच राहणं ही अस्तित्वातली सर्वात रहस्यमय गोष्ट आहे!

पूर्णं इदम, पूर्णं अदा, पूर्णात पूर्ण उदिच्चते
पूर्णात पूर्ण अदायस्य पूर्णमेव अवशिष्यते (इशावास्य उपनिषद)

म्हणजे शून्यातूनच सर्व उप्तन्न होतंय आणि शून्यातच सर्व विलीन होतंय पण या उत्पत्ती, स्थिती आणि लयीत शून्य जसच्या तसं राहतंय आणि म्हणून शून्यच पूर्ण आहे! हे शून्य निरर्थक नाही परिपूर्ण आहे आणि अत्यंत वेधक, रमणीय आणि गूढ आहे.

या सर्व अनाकलनियतेतून अध्यात्म एका निषकर्शा प्रत पोहोचलं तो अत्यंत महत्वाचा आहे, अस्तित्वातली प्रत्येक गोष्ट एकमेकावर अवलंबून आहे आणि सर्व अस्तित्व मिळून 'एकसंध ऑरगॅनिक युनिटी' आहे!

हे अस्तित्व एखाद्या कॅलिडोस्कोप सारखं आहे, इथे एक काच जरी हलली तरी नवं काँबिनेशन तयार होईल आणि तुम्ही कार्यकारण शोधे शोधे पर्यंत दुसरी काच हलेल की परत नवं काँबिनेशन तयार होईल! तुम्ही कसला ऍनॅलिसिस करणार कारण एक सुटायचा अवकाश की दुसरं तयार! द लाईफ इज अ कंटिन्योअस डायनॅमिक प्रोसेस अँड देअर इज नो स्टॅटीजम दॅट कॅन बी ऑबजर्व्ड.

त्यात पुन्हा सगळं आपोआप कारण मुळात सर्वच निराकार! त्यामुळे इथे 'व्यक्ती अशी' कुणी नाहीच आणि म्हणून व्यक्तीगत नियतीचा प्रश्नच नाही! असेल तर सर्व अस्तित्व मिळून एक नियती आहे पण ती इतकी गूढ आहे की तिची उकल होऊ शकणार नाही. एखाद्या गोष्टीची उकल व्हायला कुणी तरी निरिक्षक अस्तित्वा बाहेर हवा आणि ते तर्कानी सुद्धा अशक्य आहे.

अशा प्रकारे अध्यात्म म्हणतं तुम्ही वैश्विक स्तरावर पाहा म्हणजे व्यक्तीमत्वाचा प्रश्न सुटेल, मुळात 'व्यक्तीच नाही' हा बोध तुम्हाला होईल.

आता या बोधातून जगा, मग तुम्ही शास्त्रज्ञ व्हा की आध्यात्मिक की आणखी कुणी, तुम्ही जे कराल ते, जे जगाल ते मजेचं होईल. कुणाच्याच आत कुणीही नाही म्हटल्यावर सगळा बखेडाच मिटेल!

आता इतक्या सुरेख आध्यात्मिक परिमाणाची प्रचलित ज्योतिष शास्त्रानी काय अवस्था केलीयं ते बघा.

तथाकथित ज्योतिष्यांचा इतकं समजायचा वकूब नसल्यानं त्यांनी त्यातला अर्धाच भाग उचललायं, जगण्याला वैश्विक परिमाण आहे ना? ग्रह, तारे आणि आपण यांचा संबंध आहे ना? त्यांचा या जीवनावर परिणाम होतो ना? मग आता थांबा मी माझ्यावर नक्की काय परिणाम होतो ते जन्म वेळची कुंडली मांडून ठरवतो! किंवा तुमची कुंडली दाखवा सांगतो.

त्यांना मुळ मुद्दाच कळला नाही, जगण्याचं वैश्विक परिमाण याचा अर्थ ज्याची कुंडली मांडता येईल असा कुणी नाहीचेयं! तर तुम्ही ज्योतिष काय सांगताय? तुमचा कागदच खोटायं तर तो पाहून तुम्ही कुणाची नियती सांगताय?

ज्याचं विभाजन होऊच शकत नाही त्या आकाशाचं विभाजन करून कसल्या निर्माण केल्यात राशी आणि कसलं आलंय राशी भविष्य! टाईम पास म्हणून बरंय पण ज्योतिष हे शास्त्र नाही!

संजय
दुवा क्र. १

जे जगतो तेच लिहितो!

सत्य समजणं आणि आपण स्वत:च सत्य आहोत हा बोध होणं यात अंतर नाही