अननसाचे पन्हे

  • १ अननस
  • काळी मिरि पावडर १/२ चमचा
  • फ्रेश पुदिना पाने किंवा ड्राय पुदिना पावडर
  • काळे मीठ चविप्रमाणे
  • भाजलेले जिरे अर्धवट कुटुन केलेलि पावडर १/२ चमचा.
  • साखर चवीप्रमाणे
  • १ लिंबाचा रस
१५ मिनिटे

साहित्यः

~ सर्वप्रथम अननस जाळावर भाजून घ्या. हो भाजून घ्या. आता सुरीने सोलून घ्या.-------------------------->



~ उभे काप करा. फूड प्रोसेसर किंवा ज्युसर वर ज्यूस काढून घ्या.
यात वरील सगळे साहित्य घालून छान वर खाली करा.------------------------------------------>



~  फ्रीज मध्ये थंड करून किंवा बर्फाचा चुरा घालून ग्लास मध्ये सर्व्ह करा...वरून भाजलेले जिरे पावडर व पुदिना पाने घालून सजवा.
--------------------------------------------------------->

टिपा :

  • १ अननसाचे १ ग्लासच पन्हे होते...     भाजून केल्याने रस लवकर खराब होत नाही. व कापायलाही सोपे जाते.   व याची चवही एकदम वेगळी व खमंग लागते.
  • साखरेच्या ऐवजी पिठीसाखर वापरली तरी चालेल.
  • कैरीचे पन्हे आपण नेहमीच करतो पण अननसाचे पन्हे जरा नवीनंच वाटले त्या मुळे मी हे अनेकदा कले आहे...तुम्ही हि करून पाहा.
  • मला फ्रेश पुदिना न मिळाल्याने मी त्या दिवशी पुदिना पावडर वापरली होती.

पुदिना पावडर----------------------------> पुदिन्याची पाने धुऊन कोरडी करावीत ....एका पसरट ताटलीत पसरावीत. व फ्रीज मध्ये ठेवावीत ३ ते ४ दिवस..पाहा छान वाळली असतील. (फ्रीज मध्ये वाळविल्याने रंग हिरवा राहण्यास मदत होते) आता बाहेर काढून आखा दिवस तशीच ठेवा म्हणजे कडक होतील. मग डबीत काढून ठेवावीत. जेव्हा वापर करायचा असेल तेव्हा पाने चुरून पदार्थात वापरावी. पुदिन्या प्रमाणे तुम्ही कोथिंबीर हि अशीच वाळवून डबीत भरू शकता..आणि पदार्थात वापरून वेगळी चव आणू शकता. हि पाने खूप कमी पुरतात. व फ्रेश कोथिंबीर पुदिना उपलब्ध नसताना त्याची कमी पूर्ण करतात.

मिडिया