एकदा सहज असा भटाकायला म्हणून निघालो
आणि भटकत भटकत एका वळणावर येऊन थांबलो
त्या वाटेवर होता दाट अंधार
खूप सरी शांतता, किड्यांचा तो किरकिराट
प्राचीन स्तंभप्रमाणे भासणारी ती झाडे..
मंद धुंद वारा, आणि पायात रुतनारे काट्याचे सडे
क्षणभर कसला तरी आवाज झाला
मनात भीतीचा गलका झाला
पुढे जाऊन पाहील
एका कोपर्यात दुख बसलेल
एकटाच स्वतशी बडबडत बसलेल..
मला धीर धरवेना
जवळ जाऊन विचारल
का रे काय झाल राडायला?
आज दुखाला कसल आलाय दुख?
मग त्याने राडन थांबवल
आणि मन मोकळ करून म्हणाल
अरे सुखाला सगळेच जवळ करतात
माझा मात्र नेहमी तिरस्कार करतात..
का रे देवाने अस मला बनवल?
सुखाच्या अगदी उलट बनवल
सुखाच आनंदाने स्वागत होत
मला मात्र नेहमी वाईट नाव मिळत
कधी बघा
मी कोणालाच नको असतो
त्याच्या मागे मात्र
प्रत्येक जण धावत असतो
का रे असा द्विजाभाव?
मलाच नेहमी वाईटपणा
सगळ्या वाईट गोष्टी आणि
भरपूर अश्रूनी मला मढवल
मी पण थोडा उदास झालो
त्याची कहाणी ऐकून विचारात पडलो
काय करणार होतो मी सुधा?
कारण..
मी पण त्यांच्यातला एक होतो..
तेंव्हा पासून ठरवल
दुखाला जवळ करून बघुया
सुखाची सगळेच अपेक्षा करतात
जरा दुखा सोबत जगून बघुया...
मग त्याला म्हटल
चल रे माझ्या सोबत
मी तुझा मित्र होईन
कधी तुला एकट वाटल
तर मी तुला सोबत देईन
आता आमची मैत्री झालीये
खूप गप्पा मारुन गट्टी जमलीये
आता सुख दिसल वाटेत तरी
मी त्याच्याकडे धावत नाही
कारण या नवीन मित्राला
परत एकट सोडवत नाही
अजुन ही ते माझ्या सोबत असत
खूप काही सहन करायला शिकवत
कधी कधी खूप रडवत
फक्त माझसाठी त्याला बनवलय
असा मला वाटत...