अंबाडीची भाजी- प्रकार २

  • कोवळी अंबाडीची जुडी-१
  • लाल मिर्च्या-५-६
  • तांदूळ
  • तूर डाळ
  • लसूण
  • शेंगदाणे
  • फोडणीचे साहीत्य.
३० मिनिटे
६-७ वाट्या.

प्रथम कुकर मध्ये एका भांड्यात तूर डाळ, तांदूळ, शेंगदाणे आणि दुसर्या भांड्यात अंबाडीची भाजी लावून ५-६ शिट्ट्या माराव्यात (कुकर च्या)... (    पी. जे. )

नंतर कढईत कडकडीत फोडणी करावी. त्यात मोहरी, थोडा जास्त हिंग, लसूण आणि लाल मिरच्या मोडून घालाव्यात.

कूकर मधील अंबाडीचे पाणी काढून टाकावे. मग घुसळण्याच्या रवीने  छान घुसळून कढईत टाकावी. घुसळले कि भाजी पांचट होत नही.  थोडेसेच परतावे. मग दुसर्या भांड्यात जे तूर डाळ, शिजलेले तांदूळ आणि शेंगदाणे आहेत ते थोडे घुसळून टाका.

छान मिक्स करा. ही भाजी थोडी तिखटच मस्त लागते.

फोडणीः- कडकडीत तेलात मोहरी तडतडली की लसूण कुरकुरीत तळा. भाजीवर घालून खाऊन टाका आता.  

भाकरी आणि आंब्याचे लोणचे या बरोबर बेस्ट लागते.

आई