इडली फ्राय

  • दहा - बारा तयार ईडल्या, चाट मसाला एक चमचा, मिरची पावडर अर्धा चमचा, मिठ चवीनुसार, तेल.
  • टोमॅटो सॉस., कोथिंबीर बारीक चिरलेली.
१० मिनिटे
चार लोक

ईडलीचे काप करुन घ्या(एका ईडलीचे चार तुकडे) , कढईत तेल गरम करुन

या सर्व ईडल्या मध्यम आचेवर, गुलाबी रंग येइपर्यंत तळून घ्या, गरम असतानाच त्यावर चाट मसाला व मिरची पावडर

आणी मिठ अगदी थोडे भुरभुरावे.

व चागंले मिक्स करावे.

गरम गरम ईडली फ़्राय टोमॅटो सॉस बरोबर खायला द्यावे.

टिप - मिठ टाकताना बेतानेच टाकावे, कारण ईडली बनवताना त्यात मीठ घातलेले असते.