कोथिंबिरीच्या वड्या

  • कोथिंबीर
  • आले
  • लसूण
  • हिरव्या मिरच्या
  • डाळीचे पीठ (बेसन)
  • मीठ
  • तेल
३० मिनिटे
ज्या प्रमाणात बनवू त्या प्रमाणात माणसे खाऊ शकतात.

प्रथम कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. एक वाटी डाळीचे पीठ घ्या. त्यात वाटलेले आले लसूण आणि मिरची घाला. साधारण भज्यांच्या पिठाइतपत पातळ करा. त्यात चवीपुरते मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घाला. आता थोड्या खोलगट थाळ्या किंवा धातूच्या डब्यांची झाकणे घ्या. त्याला तेलाचा हात फिरवून घ्या. आता पळीने वरील मिश्रण एका थाळ्यात दोन पळ्या एवढे घाला. (पळीने एवढ्यासाठी की कोथिंबीर खाली राहू नये. ) या थाळ्या कुकरमध्ये ठेवून (एकावर एक ठेवायच्या असल्यास दोन थाळ्यांच्यामध्ये ताटली ठेवू शकता. अन्यथा एकेक थाळी पण ठेवू शकता.) शिटी न लावता १० मिनिटे वाफ येऊ द्या. नंतर गॅस बंद करून ५ मिनिटे ठेवा. मग कुकर उघडून थाळ्या बाहेर काढा. थोडे थंड झाल्यावर सुरीने वड्या कापून काढून घ्या.

या वड्या अशाच छान लागतात. आणखी चव हवी असेल तर फ्राय पॅन मध्ये शॅलो फ्राय करू शकता.

माझा भाऊ