शून्य कसा फुटतो

मी पाहतोय
निर्गुण निराकार
अव्यक्त शून्याकडे
कि त्याने फुटावं
कुठून तरी देव 
नाही तर किमान
सैतानाचे तरी
थैमान याव

सैतानाची थैमान
येतात आणि जातात
ऊर फुटतात
पण शून्य
काही केला
फुटत नाही

मग समजावतो
स्वतःच स्वतःलाच
आयुष्याचं गणित
एवढ्या सहज
सुटत नाही

काय चांगल,
काय वाईट ?
पट आपला
आण
आकडे आपले मांड,
गणित आयुष्याचं
सोडव
आपल आपण !

नाहीतरी बाकी काय
करतात आपले आकडे
आपण मांडतात
त्या आकड्यांखातर
हसतात रडतात
आणि मरतात

गणित असतरी सुटेल
नाहीतर तसंतरी सुटेल
तुलाही येतील
आकडे एक दिवस
शून्य फुटेल ना फुटेल
पण तू शून्यात
जाशील एवढ निश्चित

बळ आता आपल एकवट
त्या शून्या कडे जाण्या
करता, मग आकडे
जमा करत जा
अथवा शून्याकडेच बघत
प्रवास कर,
प्रवास नाही
झेपला तरी हरकत नाही
नाही, तो न फुटणारा शून्य
अनुभवशील तू  कसा
तुझ्याकडे धावेल तो
आणि तुला सामावून घेतो ते.
 
पण लक्षात घे अजून
निरोपाची वेळ झाली नाही
बघ जरा बघ
आकड्यापलीकडे बघ
खुदकन हास
आणि अनुभव शून्य
कसा फुटतो ते.