पगार वाढताना

केव्हा केव्हा असेही दिवस येतात , जेव्हा माकडे सिंहाना रेटींग देतात .

पुन्हा पुन्हा कोलांटी मारून KPI भरला जातो, आणि गोंधळात गुपचुप IDP उरकला जातो.

पि ए  भरताना F११ ची आठवण येते, स्वःताच स्वःताला रेटींग देताना डेडलाइन निघून जाते,

३६० डिग्री फ़ीडबॅकची मजाच आहे न्यारी, तु मला दे - मी तुला देतो म्हणत पास होतात सारी.

MIDYEAR चा पि ए डोळ्यासमोर असतो , आपल्याला हवा असलेला फीडबॅक त्यात कधीच नसतो.

APPRAISAL करताना चुकांचे खिळे होतात, पेपर टाकल्यावर मात्र सीटीसी वाढवून देतात.

रेटिंग वरून वादाचा सुरू होतो नवा खेळ, त्यात पटकन मिळते एका नव्या INTERVIEW ची वेळ.

लगेचच  झोपलेला सिंह जागा होतो, माकडांकडे शेपटी फेंदारून बघतो,

नंतर आपले सामान उचलतो आणि गुपचुप दुसऱ्या जंगलात जाण्यासाठी निघतो.

मानव........