सहकारनगर अपघात

सहकारनगर नं २. एक हॅपनींग प्लेस. ऑफिस वरून येताना गर्दी दिसली.. मनात अपघाताची पाल चुकचुकली.. दुर्दैवाने ती खरी ठरली.. कायनेटिक वरचा माणूस पडला होता.. डोके अक्षरशः चेपले गेले होते.. पोटात ढवळून येणे म्हणजे काय हे अनुभवले.. आजच्याच पेपर मध्ये कोण, कुठला, नक्की काय झाले हे कदाचित कळेल... पण रात्रभर डोळ्यासमोर ते चित्र उभे राहील...
आता हा माणूस गेल्यावर झाल्यावर उद्यापासून गतिरोधक बसवण्याचे काम सुरू होईल... पार्किंग व्यवस्थित करण्याचे प्रयत्न सुरू होतील.. बहुतेक सरकारी यंत्रणा ह्याचीच वाट पाहत होती.. सम/विषम दिवशी पार्किंग चे बोर्ड कधी गायब झाले हे कळलेही नाही... ते परत एकदा उगवतील.. गाड्या उचलणे आणि तोडपाणी करणे चालू होईल... समोरच पावभाजीचे दुकान आहे.. त्या समोर एकेरी दुहेरी पार्किंग केलेले असते... किती वेळेला मनोमन शिव्या घालूनच पुढे गेलो.. त्यांनाही काही काळ कळ सोसावी लागेल.. ४ चाकी मध्ये कॉफी/ज्यूस आणून न दिल्यामुळे त्यांचेही काही नुकसान होईल... हातगाड्या हटवल्या जातील.. मागे मठापाशीही एका नगरसेवकाने आपली मतपेढी साठी चांगलीच सोय केली आहे.. तिथेही वाहतुकीचा बोऱ्या वाजला आहे.. ह्या निमित्ताने तिथेही (कदाचित! ) काही हालचाल दिसेल.. २-३ महीने हे यथासांग चालू राहील आणि नंतर थंड होईल, परत एकाला मारण्यासाठी....

जन पळभर म्हणतील हाय हाय..
मी जाता होईल वाहतूक सुरळीत.

पार्किंग सुधारेल, हातगाड्या हटतील
गर्वाने हे नगरसेवक सोयी दाखवतील
असेच चालेल हे दोन मास
होईल का हाच अंतराय?