मी बोर्ड बोलतोय...

             मी बोर्ड बोलतोय बोर्ड, बरेच वर्षांपुर्वी एका पुढा ऱ्या कडुन लागलेला बोर्ड....ध्रु...

             त्यादिवशी जोरदार सोहळा होता, रंगवलेला शिवाजी आणि शेजारी एक मावळाही होता...
             हार, तुरे, पेढे अगदी काहिही कमी नव्हतं, पुढाय्राच्या पुढे उभी होती एक फोर्डं...१...
              
           माझ्यावर काय लिहितात मजकुर? मला माहित नसतो काय?...
         पण एक दिवस उलटला कि लिहिणारे म्हणतात बायबाय...
         जसा रंगाचा ब्रश असतो ना, तसच यांच मन कोरडं...२...
         मी दुकानाचा असलो ना, की वाईट वाटत नाही, पण संघटनेचा असलो ना कि खटकत...
         बाजार संपताच ऊठून जातात, उरतं मोकळं मार्केटयार्डं....३...
          परवाच एका कुत्र्यानी माझ्यावर शू केली, त्यानिमित्तानी जमलेली धुळ जरा तरी कमी झाली...
         तुम्हाला ऐकताना ख्खिन्नता वाटेल, पण लांबून हसत होत एक थेरडं...४...
         अता मला ह्या चौकात चांगली पन्नास वर्ष झाल्येत, मला रंगवलेल्यां ची तर पोरंही कामाला आल्येत...
         त्यातल्याच एकानी चिकटवलं पर्वा, "पुढारी कसे व्हाल? " या कोर्सचं कार्डं...५...
       कसली समाज सुधारणा अन कसला आलाय मान? माझ्याच खांबांचं थुंकून केलय पिकदान...
       पण पुढच्याच चौकात दिसतो डोंबाय्राचा खेळ, तोच शिकवून जातो कशी जमवायची भेळ...
       नव्यातलं नवं देतानाही वापरावं जुनं कार्ड...६...
     आता समाज सुधारणा कशी होईल?.. याची मला चिंता नही, निरोप घेता घेता सांगतो मीही कहि...
     एक दिवस हे  भाषण ऐकण्यापेक्षा...रोज वाचा हे मनोगत फर्डं...७...
             मी बोर्ड बोलतोय.... बोर्ड.........................पराग दिवेकर....