तू

तू कवडसा चांदण्याचा

अलगद उशीवर येणारा,

तुझा स्पर्श थंडीतल्या उन्हाचा

हळूच मिठीत घेणारा,

तुझी नजर नव्यानं पाहायला

सारं काही,

तुझा आधार पेलून न्यायला

सारं काही,

तू एक जाणीव एकटं नसल्याची,

तू एक जाणीव तू माझ्यातच असल्याची.