व्हेज. पिझ्झा

  • कांदा - ६ नग
  • लसुन - १५-२० पाकळ्या
  • तेल - २ टेबल स्पुन
  • टॉमेटो सॉस - ७५मिली
  • ओरिगॅनो हर्ब - १ टि स्पुन
  • कोबी - टॉपिंग साठी (अंदाजे आर्धा)
  • सिमला मिर्ची (बेल पेपर्स) - लाल, पीवळे, हिरवे - प्रत्येकी १
  • बेबी कॉर्न - ७ ते ८
  • स्विट कॉर्न - १ वाटी
  • गाजर - आर्धा (उभे काप)
  • काळे ऑलिव्ह - १५
  • पिझ्झा बेस - ४-५
  • बटर
  • तेल
  • मोझरेला चीज ( पिझ्झा चीज)
  • मिठ
  • तिखट
२० मिनिटे
३-४

पिझ्झा सॉस:१) एका मायक्रोवेव मध्ये चालणाऱ्या भांड्यात तेल टाका व ते  मायक्रोवेव  मध्ये १ मि. लावा. २) आता या गरम झालेल्या तेलात लसूण (बरीक कापलेली) टाका व १ मि. लावा.३) आता यात बारीक कापलेला कांदा टाका, नीट मिक्स करा ते २ मि. लावा.४) आता यात अंदाजे तिखट टाका व नीट मिक्स करा ते २ मि. लावा.५) यात टॉमेटो सॉस टाका व नीट मिक्स करा ते ३ मि. लावा. (कांदा नीट कोट होईल इतका टॉमेटो सॉस  घ्या, अगदी कामी  पण नको व जास्त  पण नको)६) एकदा हालवा व अरोमा येईल इतक ओरिगॅनो  हर्ब टाका  आणि   चवी  प्रमाणे  मीठ टाका. मायक्रोवेव  मध्ये १ मि. लावा.       पिझ्झा  तिखट नसतो पण जर तिखट आवडत असेल तर यात  चिली फ्लेक्स टाका.    बाजारात  नाही मिळाल्या तर लाल मिरची (सुकी)  थोडी  परतवा व मिक्सर मध्ये थोडी बारीक करा)  या सॉस  मध्ये  जर  लसूण   ची   चव आवडत  असेल   तर  लसूण  च्या    ३-४ पकल्या चेचून टाका. पिझ्झा टॉपिंग:भाज्या (उभे काप) करून अगदी थोड्या तेलात परतवून घ्या.( या वेग वेगल्या  परताव्या. ) बटर मध्ये केल्यास अजून चांगले लागते. काले ऑलिव्ह कच्चे घ्यावे.पिझ्झा १) मायक्रोवेव (डबल ग्रिल कन्व्हेक्शन) किंवा साधा ओव्हन  प्रिहिट २०० C ला करा.२) पिझ्झा बेस वर टोचे मारा व त्याला बटर लावा. ३) या वर पिझ्झा सॉस लावा आणि त्या वर भाज्या नीट पाहिजे तसा मांडणी करा. ४) या वर  मॉझरेला चीज खिसून टाका.  ५) आता  मायक्रोवेव डबल ग्रिल वर साधारण ४-५ मि. लावा.  साध्या ओव्हन  मध्ये करत असल्यास ४-५ मि. नि चेक करवे. ६) आता गरम पिझ्झा तयार. 

१) टॉपिंग म्हणून टोफ़ु, पनीर, नॉन व्हेज पदार्थ वापरू शकता.

२) पिज्जा सॉस गॅस वर पण बनवला चालतो.
३) यातील व्याकरणा च्या चुकां वार ध्यान देउ नये.