चला! पुन्हा एकदा प्रेम पाहावे करून...........

वाटले होते, पुन्हा एकदा तुला भेटावे,
जरा आणखी जवळून ओळखून घ्यावे,
होता जरी हा सौदा संसाराचा,
वाटले, चला! प्रेम करून तर पाहावे......

तुझ्या डोळ्यांतून पाहिलेल्या महानगरीला,
तुझ्या सोबतीत पुन्हा एकदा जिवंत करावे,
या गर्दीमध्येही आपण दोघांनी मात्र विरक्त असावे,
वाटले, चला! प्रेम करून तर पाहावे......

आपली भेट होणे, देवाच्याही मनात नसावे,
म्हणून की काय, माझ्या मनात अहमने ठाण मांडावे,
मनातल्या या योजनांना उघड्या डोळ्यांतील स्वप्न ठरवून,
ठरवले, चला! पुन्हा एकदा प्रेम पाहावे करून......