बंध माझे आसवांशी , मलाच न कळले..
स्वप्नांच्या सदाफुलीचे सारे अस्तीत्वच झिजले,
रेखीलेल्या रांगोळीचे जणू रेखाटन चुकले..
बंध माझे आसवांशी , मलाच न कळले..
आशा भासे उदयची, पण काजवे ही निवले,
संपले सगळे तरीही जीव कणात जागवले..
बंध माझे आसवांशी , मलाच न कळले..
जूकलेल्या नजरेने कढ दुःखाचे गिळले,
कंठ दटलेला, पण गाली स्मितहास्य फुलले..
बंध माझे आसवांशी , मलाच न कळले..
मृगजळाच्या पाण्यावर परत मन घुटमळले,
बरे स्मरूनी त्या आठवणी मी मरणास कवटळले..
--
मिताली