मर्यादेची भिंत राखू कशास मी
आयुष्याची झालीच माती
आता कुंपणाची चाड ठेवू कशास मी
ईश्वराच्या मंदिरी कान्होपात्रा हि नाचली
माझ्याच घुन्गारास अबोल ठेवू कशास मी
आकांत हृदयाचा रोखणार ना कोणी
आसवांचा पाऊस वाहू कुणास मी
पदरानेच सोडली लाज अन
वाऱ्याच्या वेडात हरवून बसला शील
काळोख झाकण्यास आकाश का पांघरू मी
पुनवेचा चंद्र बहरला चांदण्यात नाहला
डागाळलेली कांती अन शाप विसरू कसा मी
अशीच माझी प्रतिमा आहे
सारेच संपले आहे कि तरी उरलेला श्वास आहे
त्याला तरी आता थांबवू कशास मी
pooja bhagwat