महागाईवर उपाय

मला वाटते महागाई वर उपाय आता करायचा तर नुसता सरकारी स्तरावर करता येण्यासारखा नाही तर त्यासाठी सर्वच स्तरावर विचार करायला हवा मुळात महागाई ही देखिल आपण पैसा आला म्हणजे सुखी होऊ या विचाराने आपण झपाटलेलो असल्याने पैशाच्या मागे लागल्याने झाली आहे. तेव्हा आपल्या स्तरावर करता येण्यासारखे काय काय त्याचा विचार करू.

१] आपल्या कडील मूळ संस्कृती ही घरचे खाद्य पदार्थ खायचे असताना आपल्याला आज बाहेरची चव लागली आहे ती सुधारता येणे कठिण पण धान्य व कडधान्य वगैरे रोजचे घरगुती पदार्थ हे सोडून जे इतर पदार्थ असतात ज्यामुळे आपण बदलू शकतो ते तरी कमी करावे.

२]जे नोकरदार आहेत की ज्यांना आता नवीन वेतन आयोग लागू झाला आहे त्याचा तो आयोग रद्द व्हावा पण हे सरकारी स्तरावर होईल तसे होण्यापेक्षा त्यांनी तो झाला नाही असे समजून जितके जास्त मिळाले असतील तेवढे बाजूला काढणे.

३]जी जी राजकारणी मंडळी आहेत व जे जे जनतेचे स्वतःला प्रतिनिधी म्हणवतात  त्या सर्वाचेच पगार फक्त पिवळे कार्ड मिळण्या इतके ठेवणे   व सर्वच सुखसोयी जरी त्यांना मिळाल्या तरी त्याचे खर्च मंजुरीचे अधिकार मात्र त्यावर वेळेचे बंधन घालूनच ठेवणे.

४]आज वाढलेला भ्रष्टाचार देखिल कमी होण्याच्या दृष्टीने सर्वच सरकारी अधिकाऱ्यावर बंधने असावीत .