चांदणे - डॉ. अनुराधा कुलकर्णी

बहारातले फुल इवले

फुलता फुलता करपू नये

पहाटेतली उजळ निळाई

रंगता रंगता कोळपू नये

खळाळत हा धावता निर्झर

पलही कधी थबकू नये

स्वछंदी हा लाघट शिशू

लवही म्लान बनू नये

या जातीच्या मधु सुखदांनी

सदा खुलावे खुलवत राहावे

म्हणूनीच तव वदनावरचे

चांदणे ना कधी नुरावे