रोजसखा

तू हसलीस तर हसतो मी...
तू रडलीस तर रडतो मी...
तुझ्या सौंदर्याचा जसा पागल मी...
तुझ्या गुपितांचाही  तसा साक्षीदार मी...
 
वेडावून दाखव मला, कदाचित वेडावेन ही मी...
तू रुसल्यावर मात्र, अबोल'णारा तुझा रोजसखा मी...
धक्का देऊ नकोस गं कधी मला...
तुटून पडलो तर पुन्हा न सांधणारा, तुझाच 'आरसा' आहे मी...

- सुहास विनायक मळेकर, ठाणे