आजकाल स्वप्नांच्या झुल्यावरही,
मनाला हिंदोळा नकोसा वाटतोय,
भुतकाळाच्या आठवणीभोवती,
नकोसा करडा रंग दाटतोय.
सगळं आयुष्य थांबल्यावर कदाचीत,
हे असंच होत असावं,
कितीही समजावलं स्वतःला,
तरी शब्दांचा दुष्काळ वाढतोय.
फुटलेल्या पालवीला स्पर्शायचं,
पिकलेल्या पानांना अलगद झेलायचं,
दोघांविषयी प्रेमाचा सारखाच,
झरा मना झुळझुळतोय.
मावळ्तीकडे झुकताना सुर्यासारखं,
आयुष्या उजळवून टाकायचंय मला,
दिवसा पड्लेलं स्वप्नं खर होइल,
या खुळ्या आशेवर मी जगतोय.