भरडा-भात

  • तांदूळ- १ वाटी
  • हरभरा डाळीचा रवा - १ वाटी
  • फोडणीचे नेहमीचे साहित्य, लाल सुकी मिरची, कढी साठी ताक- बेसन, जिरे, कढी पत्ता
२० मिनिटे
४ जण

भरडा - हा विदर्भातला; विशेषतः वऱ्हाडातला पदार्थ. माहेरवाशिणींसाठी केला जाणारा!

हरभरा डाळ रवा जरा जास्त तेलाची - लसूण घालून - फोडणी करून त्यात चांगला खमंग भाजून घ्यावा. त्यात बेताबेताने आधणाचे पाणी घालून २ दणदणीत वाफा आणाव्यात. तिखट मीठ जरा सढळ हस्ते घालावे. मोकळा उपमा झाला पाहीजे.

गरम वाफेभरल्या भातावर डावभर भरडा, त्यावर फोडणीचे तेल, सोबत आले घातलेली गरम कढी आणि तळलेल्या लाल मिरच्या.

लंपन च्या भाषेत : 'सर्वांगसुंदर! '

काहीजण हरभऱ्याचा रवा तासभर आधी भिजवून ठेवतात व मग मोकळ भाजणी सारखा करतात... तेही ठीक आहे.

फक्त रवा नीट शिजतो आहे कि नाही हे पाहावे अन्यथा कचवट लागू शकते.

सगळे जुने लोक